Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या खात्यात 3000 जमा होणार?

ladki bahin yojana 3000 payment date : महत्त्वाची माहिती समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणे बाकी आहे. याची प्रतीक्षा राज्यभरातील लाडक्या बहिणींना आहे. लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. हे 3000 रुपये कधी जमा होणार आणि सरकारकडून काय नवीन अपडेट माहिती समोर आली आहे, चला जाणून घेऊया..

Ladki Bahin Yojana राज्यभरातील लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये म्हणजे दोन हप्त्याची रक्कम एकदाच जमा होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना दिली आहे. लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा हप्ता एकत्रच दिला जाऊ शकतो असे महिला व बालविकास विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका माध्यमाशी बोलताना सांगितले.

28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यामुळे सरकार रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या लाडक्या बहिणींना एकत्र दोन हप्त्याची रक्कम देण्याचा विचार करत आहे. कारण ऑगस्ट महिन्याचे दोन आठवडे उलटून गेले तरीही जुलै महिन्याचा हप्ता आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या नाही.

Ladki Bahin Yojana त्यामुळे ऑगस्ट आणि जुलै या दोन महिन्याची रक्कम एकत्रच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता अधिक आहे. आता यावर सरकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की अद्याप सरकारकडून अधिकृत याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी दोन हप्ते जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील लाभार्थी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये महिन्याला दिले जातात. त्यानंतर या योजनेचा काही अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर ई- केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली.

यामध्ये अनेक महिलांची नावे अपात्र ठरली कारण यामध्ये कुटुंबाचे अडीच लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न असणे, सासू, दोन सुना, मुली यांनीही अर्ज केलेले होते, असेही अर्ज बाद झाले.

Ladki Bahin Yojana फेब्रुवारी 2025 पासून योजनेच्या निकशानुसार सर्व लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली आणि ज्या अपात्र महिला आहेत ज्यांनी लाभ घेतला होता अशी जवळपास 80 लाख पेक्षा अधिक महिलांची खाती बंद करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची वसुली करण्यात आलेली नाही.

केवळ सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल तरच त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे.

1500 येणार की 3000 जमा होणार?

Ladki B ahin Yojanaराज्यभरातील एक कोटी 66 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होत असतो. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा हप्ता आज पर्यंत जमा झालेला नाही. प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

मात्र आज 13 ऑगस्ट असतानाही अजून महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. पण हे पैसे 20 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र एका महिन्याचा लाभ खात्यात जमा होणार की दोन महिन्याचे 3 हजार रुपये एकत्र जमा होणार की रक्षाबंधनाच्या दिवशी दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार याकडे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

या योजना वाचण्यासाठी इथे क्लिक करा

रमाई आवास योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

अग्निपथ योजना

महाडीबीटी शेतकरी योजना

प्रधानमंत्री रोजगार योजना