SwaRail SuperApp: All Railway Services Now in One Place : एका क्लिकवर मिळणार रेल्वेच्या सर्व सुविधा
SwaRail SuperApp : रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय रेल्वेचे नाव सुरू झालं आहे. या ॲपच नाव आहे स्वरेल.
SwaRail SuperApp भारतीय रेल्वेचा नव सुपर ॲप स्वरेल ‘SwaRail’ App हे एकाच ठिकाणी तिकीट बुकिंग, ट्रेन स्टेटस, जेवण ऑर्डर, तक्रारी यासारख्या सर्व सेवा प्रवाशांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे आता तुमच्या मोबाईल मध्ये वेगवेगळे रेल्वेचे ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही.
SwaRail SuperApp: All Railway Services Now in One Place भारतीय रेल्वे ही देशाची जीवन रेखा आहे. अनेक कोट्यावधी प्रवासी दररोज रेल्वेचा प्रवास करतात. आतापर्यंत तिकीट बुकिंग, ट्रेन स्टेटस तपासणी किंवा तक्रारी नोंदवणे यासाठी वेगवेगळ्या ॲप वापराव्या लागत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ व्हायचा आणि मोबाईल मध्ये अनेक रेल्वेच्या ॲप डाऊनलोड कराव्या लागत होत्या. परंतु आता हे सगळं अगदी सोपं झालेलं आहे ते म्हणजे स्वरेल ॲपमुळे.
SwaRail SuperApp: All Railway Services Now in One Place स्वरेल हे सगळं एकाच ठिकाणी प्रवाशांना उपलब्ध करून देणार. सर्व सुविधा उपलब्ध करून देणार आहे. रेल्वे मंत्रालयाच हे पाऊल डिजिटल इंडिया मोहिमेच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सध्या भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या 100 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यापैकी 70 कोटी नागरिक अँड्रॉइड फोन वापरतात. अशावेळी एकाच ॲपवर सर्व रेल्वे सुविधा प्रवाशांना अनुभव सुधारण्या साठी गेम चेंजर ठरू शकतो.
Indian Railways SwaRail app will be very useful स्वरेल सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम CRIS ने विकसित केलेलं स्वरेल हे ॲप सुद्धा अँड्रॉइड आणि आयओएस युजर साठी बीटा आवृत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे IRCTC रेल कनेक्ट, UTS मोबाईल ॲप आणि रेल मदत यांसारख्या सेवांसाठी वेगवेगळ्या ॲपची गरज भासणार नाही.
प्रवाशांना काय मिळणार सुविधा
- तिकीट बुकिंग : रिझर्व्ह्ड, अनरिझर्व्ह्ड आणि प्लॅटफॉर्म तिकीट अगदी सहज पद्धतीने बुक करता येईल.
- ट्रेन आणि PNR पीएनआर स्टेटस : एका क्लिकवर ट्रेनचे वेळापत्रक, तुमचं तिकीट, थांबे याची स्थिती तपासता येईल.
- जेवण ऑर्डर : प्रवासात चविष्ट जेवण मागवण्याची सुविधा या ॲप मध्ये उपलब्ध आहे.
- पार्सल आणि मालवाहतूक सेवा : सामान व मालवाहतुकीसाठी सहज माहिती आणि बुकिंग करता येईल.
- रेल मदत : कुठलीही समस्या किंवा तक्रार थेट ॲप मधून नोंदवता येईल.
सिंगल साइन
Indian Railways SwaRail app will be very useful ‘स्वरेल’ अॅपचं आणखी एक आकर्षण म्हणजे सिंगल साइन-ऑन सुविधा. यामुळे IRCTC किंवा UTS चे आधीचे लॉगिन तपशील वापरून एकदाच लॉगिन केल्यावर तुम्हाला सगळ्या सेवांमध्ये फेरप्रवेश करता येतो. याशिवाय, बायोमेट्रिक, एम-पिन सारखे सुरक्षित लॉगिन पर्याय उपलब्ध असल्याने डेटा सुरक्षित राहतो.
कसे वापराल स्वरेल ॲप
How To Use ‘SwaRail’ App
it will greatly benefit crores of passengers
सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जा.
तिथून ‘स्वरेल’ ॲप डाऊनलोड करा.
तुमचे IRCTC किंवा UTS लॉगिन तपशील करून लॉगिन करा किंवा नवीन खाते तयार करा.
ॲप वापरल्यानंतर तुमचा अनुभव आणि अभिप्राय रेल्वे मंत्रालयाला पाठवा.
जेणेकरून अंतिम आवृत्ती आणखी परिपूर्ण बनवता येईल.
रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, युजरच्या अभिप्रायानंतर आणि सुधारित चाचणीनंतर हे ॲप लवकरच सर्वांसाठी अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. तुमचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर आणि डिजिटल होणार आहे.