Union Road Transport Minister Nitin Gadkari said track working hours of driver : नितीन गडकरी यांनी केलेली काय आहे घोषणा
Union Road Transport Minister Nitin Gadkari said track working hours of driver देशातील वाढती अपघाताची संख्या पाहता केंद्र सरकारने यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी आता देशातील जड वाहन चालवणाऱ्या चालकांना 8 तासापेक्षा अधिक वाहन चालवता येणार नाही. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना ट्रेक करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी दिली आहे.
Union Road Transport Minister Nitin Gadkari said track working hours of driver In Marathi यावर आमचे सरकार काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता लवकरच देशातील जड वाहन चालवणाऱ्या चालकांना केवळ 8 तासच वाहन चालवता येणार आहे. विकसित देशांमध्ये ही कामाची पद्धत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Union Road Transport Minister Nitin Gadkari said track working hours of driver केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, विकसित देशांमध्ये ड्रायव्हर केवळ 8 तासच ड्रायव्हिंग करत असतात भारतातही जड वाहन चालवणाऱ्या चालकांनी 8 तास काम करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त अपघात रोखण्यासाठी चालकाची झोप लागल्यास उठवणारे आलार्म असण्यावरही मोठे काम करण्यात येत आहे.
Nitin Gadkari News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चालक वर्ग संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. ते म्हणाले की सरकार जड वाहन चालवणाऱ्या चालकाच्या चालकाच्या कामाचे तास ट्रॅक करण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्याचे काम करत आहे यावेळी त्यांनी चिंता व्यक्त करत साधारणता एक चालक 12 तास पेक्षा अधिक वेळ काम करतात त्यामुळे त्यांची सुरक्षा आणि काम वरही विपरीत परिणाम पडतो.
Nitin Gadkari News नुकतेच जयपुर मध्ये झालेल्या एलपीजी गॅस टँकर स्फोटातील चालक 12 तासापेक्षा अधिक वेळापासून वाहन चालवत असल्याचे समोर आले आहे असे गडकरी म्हणाले.
विकसित देशात आठ तास पर्यंतच ड्रायव्हिंग
Nitin Gadkari विकसित देश असलेल्या अमेरिका, युरोप आणि दुसरे विकसित देशांमध्ये चालकांना अधिक तर 8 तास पर्यंत गाडी चालवतात त्यांना तेवढीच परवानगी असते. भारतामध्ये आठ तास गाडी चालवणे व चालवण्याचे नियमाचे पालन करण्यात येत नाही. आम्ही या संदर्भातील विविध विषयावर विचार करत आहोत. यामध्ये चालकाचे कामाचे तास ट्रॅक करण्यासाठी आधार कार्ड ला सिस्टीम ला स्वाईप करणे चा समावेश करण्यात येणार आहे.
झोपेपासून जागवणार आलार्म मोड
याद्वारे पाहण्यात येणार आहे की जड वाहन चालवणारे चालक किती तास गाडी चालवतात. आम्ही सर्व नवीन जड वाहनांमध्ये स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टीम इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि चालकाला झोप आली असेल तर आलार्म ऑडिओ अलर्ट तरी अनिवार्य करण्यावर काम करत आहोत अशी माहिती गडकरी यांनी दिली.
Nitin Gadkari News सरकार चालक अधिक वेळ गाडी चालवत असल्यास घंटे ट्रॅक करणार आहे. यावर वेगाने काम करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून वाहन स्थान ट्रेकिंग डिवाइस (व्हीएलटीडी) आणि आधार कार्ड यांना एकत्र कैसे करता येईल यावर काम केले जात आहे अशी माहिती रस्ते परिवहन सचिव व्ही. उमाशंकर यांनी दिली.
Nitin Gadkari News सर्व व्यावसायिक वाहनांमध्ये व्हीकल लोकेशन ट्रेकिंग म्हणजेच व्हीएलटीडी लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मात्र मोटर परिवहन कर्मचारी अधिनियम राज्यांना काम करण्याची स्थिती आणि ड्रायव्हिंग तास निश्चित करण्याचा अधिकार देतो. मात्र केवळ काही राज्याने आधिसूचना काढली आहे.