PM Fasal Bima Yojana In Marathi : पंतप्रधान पिक विमा योजना

PM Fasal Bima Yojana : जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

PM Fasal Bima Yojana In Marathi : पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरुवात झालेली आहे. जर तुम्हीही शेतकरी असाल तर तुम्ही पंतप्रधान पिक विमा योजनासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून नुकसान झाल्यानंतर तुमच्या पिकाला योग्य नुकसान भरपाई मिळू शकेल. पंतप्रधान पिक विमा योजनेचे लाभ तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता.

आता राज्यातील काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे आणि त्या भागामध्ये पेरण्याही झाले आहेत किंवा सुरू आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाच्या पीक विमा काढणे आवश्यक आहे. पिक विमा काढण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 1 जुलै पासून तुम्ही पंतप्रधान पिक विमा साठी अर्ज करू शकता.

पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत PMFBY शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, दुष्काळ अन्य कुठल्याही प्रकारचा बेमुसमी पाऊस, आपत्ती अशा संकटाच्या कारणामुळे शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते. मात्र पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही या योजनेसाठी अर्ज केलेला असतो.

तुम्ही जर अर्ज केला नसेल तर तुम्ही PMFBY या योजनेचे लाभार्थी होत नाही. त्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाई मिळत नाही. पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी PMFBY अर्ज कसा करावा? याची प्रक्रिया काय आहे? हे आपण आज जाणून घेऊया, जेणेकरून तुम्ही पिक विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेऊ शकाल.

1 जुलैपासून बदलणार हे 7 नियम

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

अल निनोच्या नुकसानापासून वाचवेल पीएम फसल विमा योजना

पिक विमा भरण्यास सुरुवात

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पिक विमा महिन्याची माहिती दिली जात आहे. या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेच्या लाभासंदर्भात माहिती दिली जात आहे. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. योग्य वेळी जर तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण केली तर नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास सरकारकडून तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते.

पंतप्रधान पिक विमा योजना म्हणजे काय?

PM Fasal Bima Yojana 2026 भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते.

पिक विमासाठी अर्ज कसा करावा?

PMFBY Registration

PM Fasal Bima Yojana 2026 पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, शेती योग्य जमिनीची कागदपत्रे म्हणजे सातबारा, बँक पासबुक याबरोबरच शेतात पेरलेल्या पिकाची माहिती देणे आवश्यक आहे.

स्टेप बाय स्टेप अर्ज प्रक्रिया

PM Fasal Bima Yojana Step By Step Registration Process For Insuring Your Crops

  • सर्वात प्रथम तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • आता किसान कॉर्नरवरील अर्ज कसा करावा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन या पर्यावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर खरीप- रब्बी, योजना, राज्य, वर्ष याची निवड करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
  • तुमच्या वैयक्तिक माहिती मध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, बँकची माहिती आणि मागितलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर कॅपच्या कोड या पर्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला मागितलेली सगळे कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण या प्रक्रियेवर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

या व्यतिरिक्त तुम्ही क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲप द्वारे ही अर्ज करू शकता. त्याबरोबरच जवळच्या सीएससी (CSC) केंद्रामध्ये जाऊनही तुम्ही पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करू शकता. योजनेची अर्ज करण्याची माहिती किंवा योजने संबंधित अन्य कुठलीही माहिती तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही कृषी अधिकारी किंवा हेल्पलाइन नंबर 14447 या टोल फ्री क्रमांक वर कॉल करून संपूर्ण माहिती मिळू शकतात आणि या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

ई-पीक पाहणी करणे आवश्यक

e-pik pahani

Pradhanmantri Fasal Bima Yojana  : शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेल्या पिकाची ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. विमा योजनेत निवडलेले पीक आणि ई-पीकपाहणी मध्ये नोंदविण्यात आलेले पीक यामध्ये तफायतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणी मध्ये नोंदविण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, नजीकचे विविध कार्यालय कार्यकारी सोसायटी, कृषी खात्याचे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत समाविष्ट पिके

तेलबिया

अन्नपीक

वार्षिक व्यावसायिक आर्थिक फलोत्पादन पिके

बारमाही फल उत्पादन व्यावसायिक पिके

आदी पिकांचा यात समावेश करण्यात आला आहे.

FAQ

PMFBY वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY) ही केंद्र सरकारची योजना असून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

स्वतःची जमीन असलेले तसेच वैध भाडेकरारावर शेती करणारे पात्र शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्रता संबंधित राज्याच्या नियमांनुसार बदलू शकते.

कोणकोणत्या पिकांना विमा संरक्षण मिळते?

राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या खरीप, रब्बी तसेच काही बागायती पिकांना विमा संरक्षण मिळते.

शेतकऱ्याला किती प्रीमियम भरावा लागतो?

खरीप पिके – विमा रकमेच्या 2%
रब्बी पिके – विमा रकमेच्या 1.5%
व्यापारी व बागायती पिके – विमा रकमेच्या 5%
उर्वरित प्रीमियम केंद्र व राज्य सरकार भरतात.

कोणत्या प्रकारच्या नुकसानीसाठी विमा मिळतो?

पेरणीनंतरचे नुकसान
दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ
नैसर्गिक आपत्तीमुळे उभ्या पिकांचे नुकसान
काही परिस्थितींमध्ये कापणीनंतरचे नुकसान (नियमांनुसार)

पीक नुकसान झाल्यास किती वेळेत माहिती द्यावी?

पीक नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनी, कृषी विभाग किंवा अधिकृत माध्यमातून माहिती द्यावी.

अर्ज कसा करावा?

अधिकृत PMFBY पोर्टल
CSC केंद्र
बँक
अधिकृत विमा कंपनी
यांच्या माध्यमातून अर्ज करता येतो.

कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

आधार कार्ड
बँक पासबुक
जमीन 7/12 किंवा संबंधित नोंद
पेरणीचा तपशील
मोबाईल क्रमांक
आवश्यक असल्यास भाडेकराराची प्रत

विमा अर्जाची स्थिती (Status) कशी तपासावी?

अधिकृत PMFBY पोर्टलवर अर्ज क्रमांक किंवा इतर आवश्यक माहितीच्या आधारे विमा अर्जाची स्थिती तपासता येते.

विमा रक्कम कधी मिळते?

नुकसानाचे पंचनामे, पीक कापणी प्रयोग (CCE) आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा रक्कम जमा केली जाते.

तक्रार कुठे करावी?

विमा कंपनी, जिल्हा कृषी अधिकारी, बँक किंवा PMFBY हेल्पलाइनद्वारे तक्रार नोंदवता येते.

प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

शेतकऱ्यांचे उत्पादन जोखीम कमी करणे, उत्पन्न स्थिर ठेवणे, आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.