Maharashtra Farmer Loan Waiver List 2026 : शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर

Third List Released, 3.51 Lakh Farmers Included : 3.51 लाख शेतकऱ्यांचा समावेश, आधार प्रमाणीकरण अनिवार्य

Maharashtra Farmer Loan Waiver List 2026 : गेल्या कित्येक दिवसापासून राज्यातील शेतकरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या तिसऱ्या यादीची प्रतिक्षा करत होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपली आहे कारण सोमवारी राज्य सरकारच्या सहकार विभागाकडून कर्जमाफीची तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये 3 लाख 51 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची नावाचा समावेश करण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने सोमवारी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा लाभार्थी 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आता 24 लाख 67 हजार लाभार्थी शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा.

Maharashtra Farmer Loan Waiver List 2026 : दरम्यान अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना साठी महाआयटीने तयार केलेल्या पोर्टलवर बँकांनी थकीत कर्ज खात्यांची माहिती सादर केली होती. यामध्ये 31 लाख 17 हजार शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्या यादीमध्ये 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. 4 लाख 20 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी ही राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आणि सोमवारी 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी सहकार विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 24 लाख 67 हजार लाभार्थी शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश झाला आहे.

या कर्जमाफीच्या याद्या संबंधित बँक शाखा विकास संस्था व ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी मार्च 2026 अखेर कर्ज थकबाकीची खातर जमा करून जवळच्या आपले सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे असे आव्हान सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीतील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँक संदर्भात काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची रक्कम 2 लाखापेक्षा अधिक असली तरी सरकारच्या धोरणानुसार सर्व कर्जे निरंक करण्यात येणार आहे.

कोणत्या विभागात किती लाभार्थी शेतकरी?

  • राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात 2 लाख 6 हजार 450 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर अमरावती विभागात 85 हजार 76 शेतकरी पात्र ठरले आहेत. नागपूर विभागात 3,0738 नाशिक विभागात 14,244 पुणे विभागात 11 हजार 928 शेतकरी पात्र ठरले आहेत. कालावधीचा निकष
  • 1 एप्रिल 2019 ते 31 एप्रिल 2025 या काळातील वितरित झालेली 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये पर्यंतच्या थकीत पीक कर्जासह पुनर्गठीत कर्जांचा कर्जमाफी मध्ये समावेश करण्यात आला आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • राज्य सरकारने तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा निहाय यादी बँक शाखा, विकास संस्था किंवा ग्रामपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तिथे जाऊन आपले नावाची खात्री करावी.
  • शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण करावे. यादीतील शेतकऱ्यांच्या कर्ज थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीच्या तिथीनुसार नमूद करण्यात आलेली आहे.
  • 1 एप्रिल 2026 पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 मार्च 2026 रोजी कर्ज थकबाकीची खातर जमा करून आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्रावर, सीएससी केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल.
  • राज्यातील राष्ट्रीयकृत्व व्यापारी बँकांचे यादीतील काही शेतकऱ्यांची 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी रक्कम 2 लाख रुपयापेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. तरी शासनाच्या केअर कट धोरणानुसार संबंधित कर्ज पूर्णपणे निरंक करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
  • राज्य सरकारच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मयत शेतकरी तसेच वयोवृद्ध असलेल्या ज्यांची बोटाची ठसे येत नाहीत अशा लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजीच्या मानक कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांची प्रक्रिया करण्यात येत आहे.
  • कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून योजनेचा लाभ घेण्याचे सहकार विभागाकडून आव्हान करण्यात आले आहे, जेणेकरून तुम्ही कर्जमाफी पासून वंचित राहू नये.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: शेतकरी कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीमध्ये किती शेतकऱ्यांचा समावेश आहे?

उत्तर: दिलेल्या बातमीनुसार, शेतकरी कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीमध्ये सुमारे 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रश्न 2: कर्जमाफीच्या लाभार्थी यादीमध्ये आपले नाव कसे तपासावे?

उत्तर: शेतकरी आपल्या संबंधित बँक शाखेत, विकास संस्थेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून लाभार्थी यादीतील नावाची खात्री करू शकतात.

प्रश्न 3: शेतकरी कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे का?

उत्तर: दिलेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रश्न 4: आधार प्रमाणीकरण कुठे करता येईल?

उत्तर: शेतकरी जवळच्या आपले सेवा केंद्रात किंवा सीएससी (CSC) केंद्रात संपर्क साधून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊ शकतात.

प्रश्न 5: कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

उत्तर: शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचा तपशील, थकीत कर्जाची रक्कम आणि कर्जमाफीसाठीची पात्रता संबंधित बँक किंवा अधिकृत सरकारी कार्यालयाकडून तपासून घ्यावी.

Read About : Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?
Read About : Kisan Vikas Patra Yojana : 1 लाख गुंतवा 2 लाख रुपये मिळवा
Read About : PMFME Scheme In Marathi : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात संभाजीनगर देशात दुसरे
website : yojanamazi.com