Shree Shiv Stuti 2024 In Marathi : श्री शिवस्तुति मराठी

Shree Shiv Stuti 2024 In Marathi : श्री शिवस्तुति

Shree Shiv Stuti : आज आपण श्री शिवस्तुति पाहणार आहोत. ही श्री शिवस्तुति मराठी मध्ये आहे. या श्री शिवस्तुति मध्ये एकूण 31 श्लोक आहेत. यातील प्रत्येक श्लोकात शिवाची म्हणजेच भगवान शंकराची स्तुति केलेली आहे. या श्लोकामद्धे रूपाचे, परिधानाचे, शस्त्रांचे, त्यांच्या योगमुद्रेचे, इत्यादींचे वर्णन कले आहे.

Shree Shiv Stuti प्रत्येक श्लोकाच्या शेवटी “तुजवीण शंभो मज कोण तारी” असे आहे याचाच अर्थ असा की हे देवा तूच आमचा तारणहार आहेस. तुम्हीही रोज शिवस्तुति अवश्य म्हणावी.

Shree Shiv Stuti

Shree Shiv Stuti : श्री शिवस्तुति

कैलासराणा शिव चंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥

रवींदु दावानल पूर्ण भाळी । स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी ।
ब्रम्हांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २ ॥

जटा विभूती उटी चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्र्वनिवांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३ ॥

वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमाविलासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४ ॥

उदार मेरू पति शैलजेचा । श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५ ॥

ब्रम्हादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महा विदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६ ॥

कर्पूरगौरी गिऱिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदु:खें स्मरणे निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७ ॥

स्मशानक्रीडा करिता सुखावे । तो देवचुडामणि कोण आहे ।
उदासमुर्ती जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८ ॥

भूतादिनाथ अरि अंतकाचा । तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९ ॥

नंदी हराचा हरि नंदिकेश । श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १० ॥

भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदे करि काम भग्न ।
तो रुद्र विश्र्वंभर दक्ष मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११ ॥

इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी सुची तो करि ब्रम्हगोळ ।

उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२ ॥

भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रम्हामंत्र ।
विश्र्वेश विश्र्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३ ॥

प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४ ॥

कीर्ती हराची स्तुती बोलवेना । कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५ ॥

सर्वांतरी व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६ ॥

सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशिकोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १७ ॥

कर्पूरगौरी स्मरल्या विसावा । चिंता हरी जो भजका सदैवा ।
अंती स्वहीत सूचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८ ॥

विरामकाळी विकळ शरीर । उदास चित्ती न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतने चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९ ॥

सुखवसानें सकळे सुखाची । दु:खवसाने टळती जगाची ।
देहावसानी धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २० ॥

अनुहत शब्द गगनीं न माय । त्याचेनि नादे भाव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१ ॥

शांति स्वलीला वदनी विलासे । ब्रम्हांडगोळी असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रम्हचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२ ॥

पितांबरे मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीचि ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३ ॥

जिवा-शिवाची जडली समाधी । विटला प्रपंची तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४ ॥

निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुर चक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५ ॥

मंदार बिल्वे बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्र्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६ ॥

जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळा मालतिमाळ हाती ।
प्रतापसूर्यशरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७ ॥

अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे । संपूर्ण शोभा वदनी विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतीरी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८ ॥

नागेशनामा सकळा झिव्हाळा । मना जपे रें शिमंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९ ॥

एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरुपी शिव सौख्य नामी ।
शिणलो दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३० ॥

शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासि जाऊ नको ।
योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रे तपे ती नको ।
काळाचे भय मानसी धरू नको दृष्टास शंकू नको ।
ज्याचीया स्मरणे पतीत तरती तो शंभु सोडू नको ॥ ३१ ॥

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात?

नवरात्रातील 9 रंग कोणते?, आणि काय आहे शुभमुहूर्तची वेळ?

गणपतीची 108 नावे

संत ज्ञानेश्वर हरिपाठ मराठी

वाहू सुमने तव पद कमली

देवीच्या आरत्या

श्री रेणुकामाता प्रार्थना  मराठी

धूप दीप झाला आता

नवरात्रीची संपूर्ण मराठी माहिती 2024

देवीची महाराष्ट्रातील 9 प्रसिद्ध मंदिरे

महिषासुरमर्दिनी स्तोत्र

देवी आईची नऊ रुपं, रंग, फूल आणि नैवेद्याबद्दल जाणून घेऊ!

शारदीय नवरात्रीतील देवीचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा

शारदीय नवरात्रीतील देवीचे चौथे रूप कुष्मांडा देवी

शारदीय नवरात्रीतील देवीचे पाचवे रूप स्कंदमाता देवी

दुर्गामातेचे सहावे रूप कात्यायनी देवी मराठी माहिती

कालरात्री देवीची संपूर्ण माहिती

कोल्हापूरची महालक्ष्मीची माहिती

दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरी देवी मराठी माहिती

माहुर देवीची माहिती

देवाजवळ दिवा का लावावा

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी

श्री गजानन महाराज बावन्नी

श्री दत्त पंचपदी

व्यंकटेश स्तोत्र मराठी

व्यंकटेश स्तोत्र संस्कृत