vihir Anudan Yojana 2025 In Marathi : विहीर खोदण्यासाठी 5 लाखाचे अनुदान

vihir Anudan Yojana 2025 Information In Marathi : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

vihir Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदायची आहे त्यांना सरकार 5 लाख रुपये अनुदान देणार आहे.

vihir Anudan Yojana या योजनेला विहीर अनुदान योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आपल्या शेतामध्ये नवीन विहीर खोदू शकतो. जेणेकरून त्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.

vihir Anudan Yojana शेतकऱ्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत सिंचनासाठी विहीर खोदण्याचे अनुदान देण्यात येणार आहे. राज्य सरकारने मनरेगा अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये मोठी वाढ केली आहे.

vihir Anudan Yojana यापूर्वी या योजनेअंतर्गत 4 लाख रुपये पर्यंतच्या अनुदान शेतकऱ्यांना वीहिर खोदण्यासाठी देण्यात येत होते मात्र यामध्ये राज्य सरकारने 1 लाख रुपयांची वाढ केली असून आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मनरेगा अंतर्गत विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा होणार उपलब्ध

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana  राज्यातील शेती अधिकाधिक ओलिताखाली यावी यासाठी राज्य सरकार विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करत असते. या माध्यमातूनच सरकारने मनरेगा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहीर खोदण्यासाठी अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana  या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खोदू शकतो. महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये मनरेगा अंतर्गत कामे सुरू आहेत. त्या भागांमध्ये विहीर अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे.

अशी होते निवड

Ahilyadevi Sinchan Vihir Yojana प्रथम शेतकऱ्याने आपल्या ग्रामपंचायत मध्ये वीहिर खोदण्यासाठी अर्ज करावा. त्यानंतर पात्र असलेल्या लाभार्थी शेतकरीची या योजनेअंतर्गत निवड होते. त्याबरोबरच नंतर विहीर खोदण्यासाठी परवानगी देण्यात येते. परवानगी मिळाल्यानंतर काम सुरू होते. काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

vihir Anudan Yojana Beneficiors

अनुसूचित जाती, जमाती, भटक्या व विमुक्त जातीतील शेतकरी, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र रेषेखालील कुटुंबे, महिला, कर्त्या असलेले कुटुंब, दिव्यांग व्यक्ती करता असलेले कुटुंब, जमीन सुधारण्याच्या लाभासाठी इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी(2.5 एकर पर्यंत जमीन) असणे आवश्यक आहे. या घटकातील सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

विहीर योजनेची पात्रता

vihir Anudan Yojana Eligibility

  • शेतकऱ्याकडे सलग एक एकर शेती असणे आवश्यक आहे.
  • पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पासून 100 मीटर पर्यंत अंतर असणे आवश्यक आहे.
  • दोन विहिरीमध्ये 250 मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीय व दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी हा नियम नाही.
  • सातबारावर यापूर्वी विहिरीची नोंद नसावी.
  • याबरोबरच अर्ज शेतकरी हा जॉब कार्डधारक असावा. तरच मनरेगा अंतर्गत या योजनेचा लाभ घेता येतो.